Mandesh.com
[[17 ऑक्टोबर २०१५]] - कन्या विद्यालय मोहीची विद्यार्थीनी कु. ऋतुजा वीरभद्र कावडे हिने सातारा जिल्हास्तरीय शालेय ६०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
मराठी  |  English 
  यात्रा / तिथीतीर्थक्षेत्रे
शिखर शिंगणापूर
Shikhar Shinganapur

माण तालुक्यातील महादेवाच्या डोंगर-रांगेतील हे तीर्थक्षेत्र शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. त्याला कोथल पर्वत असेही म्हणतात. हे तीर्थक्षेत्र सातारपासून ८९ कि. मी. वर आहे. चैत्र महिन्यात येथे उत्सव असतो आणि त्याला सर्व जाती-जमातीचे लोक उपस्थित राहतात. त्यामध्ये तेली समाज्याची कावड, कोष्टी समाज्याचे पागोटे, माळी समाजाचा दवणा व फुले, बडवे ब्राम्हणांची पूजा आणि लिंगायात स्वामींची उत्तरपुजा अशी देवाची सेवा केली जाते.
हे मंदिर समुद्र सपाटी पासून तीन हजार फुट उंच असून वर जाण्यासाठी दगडी ३०० पायर्‍या आहेत. नवा मोटार रस्ता आपल्याला थेट मंदिराच्या जवळ घेवून जातो. मंदिर पूर्वाभिमुखि असुन सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण प्रथम मंदिरात प्रवेश करतात. मुख्या मंदिराचा आकार बेलाच्या पाना सारखा असुन मुख्य पानाच्या जागी स्वयंभू शिवलिंग आहे. समोरा समोर असलेल्या दोन शाळुंका म्हणजे

शंकर-विष्णु व पार्वती-लक्ष्मी यांची प्रतीके मानतात, म्हणून या देवाला हरिहर म्हणतात. मध्यभागी रंगशिळा असुन पितळेच्या पत्र्याने मढविलेले चार मोठे नंदी आहेत. सभामंडपात एकाच जागी फिरणारे फिरते खांब आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १९२६ मध्ये शिखराचा कायापालट घडविला. डोंगरमाथ्यावरील पठाराचे दोन भाग असून एका भागाच्या टोकावर मंदीर आहे, तर दुसर्‍या भागाच्या टोकाजवळ शहाजीराहे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांची स्मारके आहेत. मंदिराच्या दिशेने हाक मारली तर समोरच्या बाजूने स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो. कै. यशवंतराव चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री कै. बांदोडकर यांची ह्या स्थानावर श्रध्दा होती. सातारच्या छत्रपतींचे हे खाजगी देवस्थान असल्यामुळे वैदिक मंत्र ब्राम्हणांचे व तांत्रिक पूजा लिंगायतांची असते.

या मंदिरापासून २ कि. मी. अंतरावर गुप्तलिंग हे निसर्गरम्य स्थान आहे. तसें स्वामी सर्वानंदजी महाराजांचा छोटा आश्रम आहे. शिखर शिंगणापूरला शासकीय विश्रमगृह आहे. पुजार्‍यांच्या घरीही भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते. पुणे, फलटण, दहिवडी, सातारा व म्हसवड येथुन बससेवा आहे.

श्री सिध्दनाथ म्हसवड
Mhaswad Siddhanath Temple

भगवान सिध्दनाथाचे हे मंदीर १२ व्या शतकात बांधलेले आहे. श्री सिध्दनाथ आणि जोगुबाई यांच्या मुर्त्या भगवान शिव-पार्वतीच्या रुपात आहेत. मंदीर हि खुप सुंदर आणि पाहण्यासारखे आहे. म्हसवड हे सातारा - पंढरपुर रस्त्यावर दहिवडी पासून ३० कि. मी. वरती आहे. नोव्हेंबर - डिसेंबरच्या दरम्यान देवदिपावलीला रथायात्रा ही मुख्य यात्रा असते. यात्रेस महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधून लाखोंच्या संख्येने भाविक येतात.

म्हसवडला शासकीय विश्रमगृह आहे. पुजार्‍यांच्या घरीही भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते. तसेच म्हसवड बसस्थानका समोर लॉजमध्येहि राहण्याची उत्तम सोय आहे. पुणे, फलटण, दहिवडी, सातारा व पंढरपूर येथुन बससेवा आहे.

श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज, गोंदावले
Gondawalekar Maharaj

गोंदावले बुद्रुक येथे श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची समधी व आश्रम आहे. श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचा काळ १८४५ ते १९१८ असा होता. महाराज्यांच्या वडीलांचे नाव रावजी आणि आईचे गितामाई असे होते. महाराजांचे बालपणीचे नाव गणपती असे होते...सवर्जण त्यांना गणु असे बोलवीत. अध्यात्मीक गुरुंच्या शोधात त्यानी बालपणीच घर सोडले. गुरुंच्या शोधात त्यांनी संपुर्ण भारत पालता घातला आणि १८६२ मध्ये श्री तुकाराम चैतन्य महाराज (तुकामाई) यांना गुरु केले. श्री तुकाराम चैतन्य महाराज यांनीच त्यांचे नाव ब्रम्हचैतन्य ठेवले.

श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज हे श्री प्रभु रामांचे निस्सीम भक्त होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी श्रीराम जयराम जय जय राम या श्री

प्रभु राम नाम जप व जपाचा महिमा याचा प्रसार केला. त्यांनी श्री प्रभु रामांची खुप मंदिरे बांधली. गोंवले येथे त्यांची समाधी व सुंदर आश्रम आहे. गोंदावले ये सातारा पासून ६५ कि.मी. अंतरावर तर सातारा-सोलापूर रस्त्यावर दहिवडी पासून ५ कि. मी. वर आहे. प्रत्येक पौणिमेस येथे भक्तांची गर्दी असते. दासनवमी, गुरुपौर्णिमा, रामनवमी आणि गोकुळ अष्टमी ला अलोट गर्दी असते. समाधी मंदिरात अखंड रामनामाचा जप चालू आहे. महाराजांची पुण्यतीथी मार्गशिर्ष दशमीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली जाते.

दहिवडीला शासकीय विश्रमगृह आहे. आश्राम परिसारात भक्त निवासात राहण्याची सोय होऊ शकते तसेच समाधी परिसरात मोफत प्रसादाचा लाभ घेऊ शकता. पुणे, फलटण, दहिवडी, सातारा व पंढरपूर येथुन बससेवा आहे.


माणदेशी वाचकांच्या प्रतिक्रिया:
दिनांकनावसुचना / मत / प्रतिक्रिया
२०१४-०५-२५ १५:५७:४९ vaibhav pingale i think we watch d information about B.K. kokare information on mandesh.com
so pl z give d information to know every one .....
२०११-०४-२७ ०८:२४:५८ Sagar Dnyandeo Kale Malawadi,Mohi yasarkhi ajun kahi tirthakshetre ahet ki ji aapan add keli nahit.
२०१०-०८-०१ १९:२१:५२ biruraj mala biroba devache mahiti havi ahe.