Mandesh.com
[[17 ऑक्टोबर २०१५]] - कन्या विद्यालय मोहीची विद्यार्थीनी कु. ऋतुजा वीरभद्र कावडे हिने सातारा जिल्हास्तरीय शालेय ६०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
मराठी  |  English 
आमच्या विषयी
माण तालुक्यातील लोक सर्व जगभर पसरलेले आहेत. या सर्वांना आपल्या माणदेशात काय चालले आहे हे समजावे म्हणून माणदेश डॉट कॉम हि वेबसाईट सुरू करण्याचे ठरविले. आपला माणदेश जगाच्या संकेत स्थळावर असावा, सर्व जगाला माणदेशाची संस्कृती, माणदेशातील लोक व माणदेशाची इतर माहिती मिळावी आणि जगाने माणदेशाला सलाम करावा हा हेतु हि त्या पाठीमागे आहे. मग तयारी सुरु झाली, डिसेंबर २००० साली माणदेश डॉट कॉम हे डोमेन रजीस्टर केले. २००२ पासून माहिती गोळा करण्यास सुरूवात केली व एकदम साधी वेब पेजेस बनवुन वेबसाईट सुरू केली.

२००६ मध्ये थोडी व्यवस्थीत डिझाईन करून आणि बातम्यांचे नवीन वेब पेज सुरू केले. सध्या हि वेबसाईट मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही भाषांबध्ये उपब्लध आहे. २०१३ साली युनीकोड मराठी मध्ये मराठीतील सर्व माहिती कनवर्ट केली. सध्या नवीन डिझाईनचे काम चालु आहे आणि लवकरच या नवीन डिझाईनसह अधीक माहितीसह हि वेबसाईट उपब्लध होईल. जी माहिती सर्वांना उपयोगी असेल अशी महिती जस-जशी उपब्लध होईल तशी ती वेबसाईटवर उपब्लध करून देण्याचे ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरू आहे.

तुमच्या प्रतिक्रिया, सुचना, तुमच्या जवळील माहिती जरूर कळवा कारण यातुनच एक अप्रतीम माणदेशाची वेबसाईट तयार होईल.

धन्यवाद आणि माणदेशी रामराम!

माणदेशी वाचकांच्या प्रतिक्रिया:
दिनांकनावसुचना / मत / प्रतिक्रिया
२०१०-०७-१३ १६:०६:३० sandeep jathar gondwalw kh mandesh.com naad naahi karayachya all the best
२००९-१०-१६ ०२:३३:५२ Mahavir Deokule Happy Diwali!
२००८-११-०२ ०६:२२:५६ ajit katkar(reporter) good information